कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळ

दामबाब, १ला मजला, श्री राम मंदिरा जवळ,
मडगांव, गोवा ४०३ ६०१, फोनः ०८३२ २७२०८६५
स्थापनाः १९७६

आमच्या विविध उपक्रम

समाज भूषण पुरस्कार

स्वातंत्र्य व लोकशाही रक्षण, संस्कृती संवर्धन, कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग. शिक्षण, विज्ञान व संशोधन इत्यादि जीवनाच्या एक किंवा अनेक क्षेत्रात निष्ठापूर्वक. निस्वार्थपणे व समर्पित भावनेने कार्य करून असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या व अशा पकारे, मानवी समाजाच्या जागतिक, भारतीय किंवा प्रादेशिक स्तरावर बहुमोल ठसा उमटविणाऱ्या दैवज्ञ ब्राह्मण समाजातील व्यक्तीला समाजभूषण हा पुरस्कार कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळातर्फे सन्मानपूर्वक देण्यात येतो.
आतापर्यंत असे दोन पुरस्कार देण्यात आले. पहिला समाज भूषण पुरस्कार भारताच्या थोर स्वातंत्र्य सैनिका श्रीमती मथुराबाई लोटलीकर याना बहाल करण्यात आला. १९४२ च्या भारत-छोडो चवळवळीतील एक झुंजार स्वातंत्र्य सैनिका म्हणून ज्यानी भारतीय स्वातंत्र्य-संग्रमात आपले असामान्य कर्तृत्व दाखविले व आपले सबंध आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य-लढ्यात व नंतर समाजकार्यात घालविले त्या श्रीमती मथुराबाई लोटलीकर ह्या अखिल भारतीय समाजाच्या भूषण आहेत.
दुसरा समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र- गंधर्व पं. सुरेश हळदणकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील असामान्य कर्तृत्वाबद्दल देण्यात आला.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात व संगीत रंगभूमीवर आपल्या अभिजात गायकीने एकाद्या तेजःपुंज ताऱ्याप्रमाणे तळपत राहून पंडीतजीनी भारतीय संगीत जगतावर आपल्या असामान्य कर्तृत्वाचा बहुमोल ठसा उमटविलेला आहे व अखिल समाजाचे ते भूषण ठरलेले आहेत.

साहित्य पुरस्कार

सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरीसाठी नाथमाधव पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट मराठी चरित्रात्मक पुस्तकासाठी पु. बा. कुलकर्णी पुरस्कार, विनायकराव देवरूखकर (वैवज्ञ लेखकासाठी). पा. पु. शिरोडकर (संशोधनात्मक पुस्तक), ज्ञानेश्वर ग. कोलवेकर (व्यक्ती-चित्रण संग्रह) आणि डॉ. हरिश्चंद्र तु. नागवेंकर (कोंकणी कथासंग्रह) असे प्रत्येकी तीन हजार रुपयांचे साहित्य पुरस्कार देण्याची योजना कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळाने १९८५ पासून सुरू केली आहे. दर तीन वर्षांच्या काळात प्रकाशित झालेल्या (प्रथम आवृत्ती) पुस्तकांच्या दोन प्रती मागविण्यात येत असतात. पुस्तकांच्या प्रती संपादक, गोमंत कालिका, दामबाब, श्ला मजला, जुना बाजार, श्री दामोदर मंदिरा जवळ, मडगांव- गोवा ४०३ ६०१ या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने मागविल्या जातात. लेखकाने सोबत स्वतः विषयी व स्वतःच्या साहित्य जीवनाविषयी थोडक्यात माहिती पाठवून पुस्तक भाषांतरीत किंवा रुपांतरीत नसल्याचा क ते स्वतंत्र असल्याचा उल्लेख करून स्वतःच्या सहीनिशी निवेदन पाठवावे लागते. ही योजना जगाच्या कोणत्याही भागातील लेखकांसाठी खुली आहे. त्यासाठी प्रवेशमूल्य नाही. पुस्तकाच्या प्रती लेखक किंवा प्रकाशक यांच्यापैकी कुणीही पाठवू शकतो. चरित्रात्मक पुस्तकासाठीची योजना एकाच व्यक्तीचे चरित्र असलेल्या पुस्तकाला लागू असते. निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुस्तकाची एक प्रत लेखक/प्रकाशकाला परत पाठविली जाते.
या योजनेखाली आतापर्यंत देण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेतः-

Margao - Goa

The Institution was founded in 1976 to fulfil the following charitable objectives and purpose:

  1. Promotion of unity and brotherhood amonst members of different communities.

  2. Overall development of all aspects of human life comprising economic, physical, Cultural, intellectual as well as spiritual wellbeing.

  3. Relief of the poor.

  4. Educations.

  5. Medical relief and

  6. Advancement of any other object of general public utility not involving the carrying on of an activity for profit.

The objectives of the Institution are being achieved, with the incessant work carried on by its members for the last 49 years. ‘Gomant Kalika’ has brought about literary and intellectural developmment of the community. The Institution has achieved unity and brotherhood among Daivadnyas and fostered good and healthy relations between the Daivadnyas and other communities.
It has instituted Prizes and Scholarships for the students of the Daivadnya community and also Prizes for the students at large, irrespective of caste and religion. It gives financial assistance to needy students and women.
It has instituted Goldsmith Awards, Artisan Awards, Social Work Award and Goldsmit Prize irrespective of caste and religion.
It has instituted three Literary Awards – Nathmadhav Literary Award, P. B. Kulkarni Literary for writers irrespective of caste and religion, and one Literary Award – Vinayak Devrukhkar Literary Award.
On occassion of its Gold Jubilee year, the Mandal has instituted three more awards, namely:
Late Dnynaneshwar Kolvekar Literary Award
Late Pandurang P. Shirodkar Literary Award
Dr. Harishchandra T. Nagvenkar Literary Award

These Literary Awards are for writers irrespective of caste and religion.
The Institution publishes every month ‘Gomant Kalika’, including two special issues on the occasion of ‘Gudi Padwa’ and ‘Diwali’.
‘Gomant Kalika’ publishes articles of social importance and short stories, poems, essays, travelgues etc., and encourages budding talent in the literary field. It has organised symposiums on issues of social relevance. ‘Gomant Kalika’ has spread scientific temper, social and ethical values among the people. Its aim has always been to bring about the growth of responsible citizenship in the country.
The Institution has been succesful in involving the people in all its activities and schemes, which has enabled it to get sponsorship for its educational and literary schemes.

समाज भूषण पुरस्कार

स्वातंत्र्य व लोकशाही रक्षण, संस्कृती संवर्धन, कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग, शिक्षण, विज्ञान व संशोधन इत्यादि जीवनाच्या एक किंवा अनेक क्षेत्रात निष्ठापूर्वक, निस्वार्थपणे व समर्पित भावनेने कार्य करून असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या व अशा प्रकारे, मानवी समाजाच्या जागतिक, भारतीय किंवा प्रादेशिक सारावर बहुमोल ठसा उमटविणाऱ्या दैवश ब्राह्मण समाजातील व्यक्तीला समाजभूषण हा पुरस्कार कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळातर्फे सन्मानपूर्वक देण्यात येतो.

आतापर्यंत असे दोन पुरस्कार देण्यात आले. पहिला समाज भूषण पुरस्कार भारताच्या थोर स्वातंत्र्य सैनिका श्रीमती मधुराबाई लोटलीकर याना बहाल करण्यात आला. १९४२ च्या भारत-छोडो चवळवळीतील एक झुंजार स्वातंत्र्य सैनिका म्हणून ज्यानी भारतीय स्वातंत्र्य-संग्रमात आपले असामान्य कर्तृत्व दाखविले व आपले सबंध आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य-लढ्यात व नंतर समाजकार्यात घालविले त्या श्रीमती मधुराबाई लोटलीकर त्या अखिल भारतीय समाजाच्या भूषण आहेत.

दुसरा समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र- गंधर्व पं. सुरेश हळदणकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील असामान्य कर्तृत्वाबद्दल देण्यात आला.

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात व संगीत रंगभूमीवर आपल्या अभिजात गायकीने एकाधा तेजःपुंज ताऱ्याप्रमाणे तळपत राहून पंडीत जीनी भारतीय संगीत जगतावर आपल्या असामान्य कर्तृत्वाचा बहुमोल ठसा उमटविलेला आहे व अखिल समाजाचे ते भूषण ठरलेले आहेत